महाराष्ट्र पोलीस मेगासिटी गृहप्रकल्पाच्या सर्व सभासदांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की रविवार दि. ०९ ऑगस्ट २०१५ रोजी बालेवाडी, पुणे येथे "फ्लॅट नंबर वाटपाचा सोहळा" होणार आहे. तरी सर्व सभासदांनी सहकुटुंब उपस्थित राहावे. | महाराष्ट्र पोलीस मेगासिटी, लोहगांव, पुणे - फेज २ चे बुकिंग चालु आहे. | महाराष्ट्र पोलीस मेगासीटी गृहरचना संस्था, लोहगांव पुणेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की ज्या सभासदांचे मोबाईल नंबर, पत्ता व हुद्दा बदलला आहे त्यांनी त्वरित कार्यालयात संपर्क करून मोबाईल नंबर व पत्ता बदलून घ्यावे.

महत्वाची सूचना

महाराष्ट्र पोलीस मेगासिटीच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०९/०८/२०१५ रोजी दुपारी २.०० वाजता घेण्यात येत असून सदर सभा संपताच फ्लॅट नंबर वाटपाचा कार्यक्रम संगणीकृत ड्रॉ पध्दतीने घेण्यात येणार आहे व त्याच बरोबर आपला इमारत क्रमांक, मजला व फ्लॅट क्रमांक कोणता आहे याची माहिती तात्काळ आपण संस्थेच्या कार्यालयात दिलेल्या मोबाईल नंबरवर देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही सध्या वापरत असलेला मोबईल नंबर आमच्या कार्यालयाच्या रेकॉर्डवर नोंद होणे आवश्यक आहे. त्याकरिता आपला मोबाईल नंबर, सध्याचा राहण्याचा किंवा कायमचा पत्ता बदलला असलयास तात्काळ कार्यालयात कळवावे व सध्या वापरत असलेल्या मोबाईल नंबरची व पत्त्याची नोंद कार्यालयातील दप्तरी करून घ्यावी. ज्यामुळे आम्हास आपल्याशी संपर्क राखणे सोयीचे व आपल्या हिताचे होईल.

आमच्या विषयी

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असून या शहराचे शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व आय. टी. क्षेत्रातील वाढते महत्व तसेच येथे उपलब्ध असलेल्या विविध वैद्यकीय सुविधा व सर्व ऋतूतील आल्हाददायक हवामान पाहता सेवानिवृत्तीनंतर कायमस्वरूपी पुण्यात स्थायिक होऊ इच्छिणारे पोलीस कर्मचारी व अधिकारी खूप आहेत. तसेच आपल्या कुटुंबियांच्या व मुलामुलींच्या भावी शिक्षणासाठी पुण्यात आपलं स्वतःचे घर असावे अशी मनस्वी इच्छा बाळगणारे ही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची मोठी संख्या पोलीस दलात आहे. परंतु सध्याचे आकाशाला भिडलेले घरांचे दर पाहता अशा सर्वांनाच आपोआप आपल्या या सुप्त इच्छेला नाईलाजाने मुरुड घालावी लागते. या पार्श्वभूमीवर पुणे येथे खास पोलीसांसाठी प्रकल्प राबवून त्याव्दारे सर्वांना परवडतील अशा किंमतीत दर्जेदार घरे उपलब्ध करून देता येतील यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न चालू होते, व त्या प्रयत्नांना नुकतेच यश आले आहे. सदर प्रकल्प लोहगांव परिसरात पोलीस आयुक्त कार्यालयापासून सुमारे १६ किलोमीटर व लोहगांव पासून ४ किलोमीटर अंतरावर असून त्याच्या एका बाजूने वॉटरपार्क व श्री. विखे पाटील यांचे कॉलेज व दुसऱ्या बाजूने माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे मराठवाडा मित्र मंडळ(MMIT) चे कॉलेज आहे. तसेच प्रकल्पाच्या जवळून ३०० फुटाचा नियोजित रोड ही जात आहे. एकूण ११६ एकर निसर्गरम्य जागेत ५२८२ निवासी सदनिका व १२० व्यापारी गाळे सदर प्रकल्पामध्ये संस्थेच्या सभासदांकारिता उपलब्ध होणार आहेत. बी. ई. बिलोमारीया, मुंबई ही बांधकाम क्षेत्रातील विख्यात कंपनी अत्यंत वाजवी दरात हा प्रकल्प तयार करून देत आहे. व सदर प्रकल्पाचे काम सध्या लोहगांव, पुणे येथे प्रगतीपथावर आहे.